अंबाजोगाई:- येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र के.क्र.३६/२०१५ सरकार वि.गोकुळ या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी गोकुळ बाबुराव रत्नपारखे रा.बोरगाव ता. केज याची कलम ३७६,४५२,५०६ भा. दं. वि.मधून सबळ पुराव्या अभावी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अनिल सुब्रमण्यम साहेब यांनी दि.०२/११/२०१८ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की,कापरेवाडी ता. केज येथील एका विधावेकडे आरोपी हा कापूस खरेदी करण्यासाठी गेला यातून आरोपी व सदर विधवेची ओळख झाली. सदर विधवेस एक मुलगा होता.आरोपीने तीस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक सुखाची मागणी केली,त्यास तिने नकार दिला असता तुझ्या मुलास पळवून नेऊन मारून टाकील अशी धमकी दिली. दि.३१/०१/२०१५ रोजी विधवेचा मुलगा हा शेतात गेला असता आरोपी हा विधवेच्या घरी आला व तीस तिचे घरात ओढत नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी विधवेने घराबाहेर येऊन आरडाओरडा केला त्यावेळी आरोपी पळून गेला.अशा प्रकारची फिर्याद विधवेने दिल्यावरून आरोपी विरुद्ध पो. स्टे. केज येथे गु. र.नं.२२/२०१५ वरील कलमान्वये गुन्हा नोंद करून प्रकरण सुनावणी साठी मा. जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.सदरील प्रकरणाची सुनावणी मा. न्यायालयात झाली असता फिर्यादी तर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.परंतु फिर्यादी पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे आरोपी गोकुळ बाबुराव रत्नपारखे रा.बोरगाव ता. केज याची कलम ३७६,४५२,५०६ भा. दं. वि.मधून सबळ पुराव्या अभावी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अनिल सुब्रमण्यम साहेब यांनी दि.०२/११/२०१८ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणात आरोपीतर्फे अँड. सचिन व्ही. कुलकर्णी (पाटोदेकर) यांनी काम पाहिले.
*अँड. सचिन व्ही. कुलकर्णी*
*9823350582*
