Friday, December 21, 2018

परळी शहरात हेल्मेट सक्ती चालू अनेकांना लावले दंड उपक्रमाचा पहिला दिवस

परळी : 
आज शहरात हेल्मेट सक्ती सुरू होणार तेच आज सकाळ पासून परळी शहर व संभाजीनगर,व बीड वाहतूक शाखा चे 4 कर्मचारी संयुक्त पथक मोहीम राबवली असून आतापर्यंत तब्बल 30 जनावर कार्यवाही करण्यात आली आहे एका नागरिकास 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे या बाबत शहर पोलीस ठाण्याचे पी.आय.देविदास शेळके यांनी परळीतील जनतेस आव्हाहन केले आहे सर्व जनतेनी सहकार्य करून हेल्मेट चा वापर करावा हेल्मेट सक्ती हे अपघातापासून आपली सुरक्षा साठीच आहे तरी परळी शहरातील व संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी हेल्मेट सक्ती चे पालन करावे असे आव्हान पी.आय.देविदास शेळके साहेबांनी केले आहे.