परळी
धर्मापूरी येथील किरण नामदेव फड यांचे अपघातामध्ये दुःखद निधन झाले.किरण नामदेव फड यांचे नुकतेच 18 डिसेंबर रोजी टोकवाडी येथे विवाह सोहळा झाला होता किरण हे आपल्या बुलट गाडीवरून जात असताना झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने तातडीने उपचारासाठी नेले असता त्यांची प्राणज्योत मावळली नामदेव फड ग्रामसेवक हे त्यांचे वडील होते अचानक घडलेल्या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे फड यांच्या दुःखात दै. न्याय टाईम्स परिवार सहभागी आहे.
