Saturday, January 12, 2019

परळी मँरेथॉनला परळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



परळी, (प्रतिनीधी)स्वामी विवेकानंद जयंती निमित्त  विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी परळीच्या वतिने दि.12 जानेवारी रोजी परळी शहरात परळी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.आज सकाळी 7,30 वा. या मॅरेथॉन स्पर्धेला प्रसिद्ध पहेलवान राहुल आवारे यांनी  झेंडा  दाखवून शुभारंभ केला, येथील  पोलीस ठाणे, राणी लक्ष्मीबाई टावर, मोंढा रोड, स्टेशन रोड, एकमिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, वडार कॉलनी मार्गे ही मॅरेथॉन पोलीस ठाण्यापर्यंत धावली, विजेत्या स्पर्धकांचे  पुण्याचे महानगर आयुक्त किरण गित्ते, दिनकरराव मुंडे गुरूजी, उषा किरण गित्ते  यांनी स्वगात केले . मंदाकिनी केंद्रे, डाॅ विजय रांदड, डाॅ. राहुल देशमुख, डाॅ. अजित केंद्र, शेख अब्दुल करीम, पी आय. गित्ते साहेब, श्रीकांत डोंगर, जि. एस सौंदळे, डाॅ. बालासाहेब कराड, डाॅ. शालिनीताई कराड, शुभांगी गित्ते, सौ. वरदा पाठक, श्रीशा कृष्णमूर्ती, मनिषा पांडे, प्रदीप खाडे, दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल तेजेस कुमार, प्रमोद पांडे, रामराव गित्ते, सुभाष नानेकर, बालाजी अनकाडे, नामदेव मुंडे, बोंडगे सर, अतुल दुबे, सुरेश मुंडे, विलास आरगडे, संजय खाकरे, बालकिशन सोनी, अॅड. प्रकाश मुंडे सुरेश फड, मदन कराड, अनंत मुंडे, बंडू अघाव, विजयानंद अघाव, चंद्रकांत चाटे, डी . एल. कांदे, गुट्टे सर, जगदीश कावरे, विजय मुंडे सर, पापा देशमुख, अजय राऊत, गुट्टे सर, अंकुश फड सर. संजय कराड, सुरेश नाना फड, बाबुशा कदम, वैजनाथ चाटे, तांदळे सर, राजभोज सर, दहिफळे सर, आदि शिक्षक, विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी जेष्ठ नागरिक,बहुसंख्येने उपस्थित होते. या मध्ये महाविद्यालयिन विद्यार्थी, महिला-पुरुष सहभागी झाले होते.