Saturday, July 20, 2019

आ.अजित पवार व ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सवात आज मेंदूचे कार्यशाळा



 परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  
      माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार व ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आधार महोत्सवात आज रविवारी मेंदूची कार्यशाळा हा शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे .    
    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार अजित पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांचा आधार महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या अंतर्गत आज दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजता लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नटराज रंगमंदिर येथे शालेय वमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रख्यात शिक्षण तज्ञ प्रा. बाळासाहेब कच्छवे यांचा मेंदूची कार्यशाळा हा शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे.
      या मार्गदर्शनाचा विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.