योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून नोंदवला निषेध
परळी /प्रतिनिधी
उत्तर प्रदेश मध्ये बुधवारी घडलेल्या 10 आदिवासी कुटुंबियाचे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने व उत्तर प्रदेश सरकारने कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी श्रीमती प्रियंका गांधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कुटुंबियांना भेटू दिले नाही या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असतानाच परळीत काँग्रेस व युवक कांग्रेस च्या वतीने तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र धरणे आंदोलन तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.
बुधवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेश मधील दहा आदिवासी पीडित कुटुंबियांवर भाजपाच्या गुंडांनी हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आले ही घटना समजताच अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशचे प्रभारी श्रीमती प्रियंका गांधी यांनी सोनभद्र येथे घडलेल्या हत्याकांडाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या असता तेथील पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यास मनाई केली परंतु आम्ही येथे सांत्वन करण्यासाठी आलो आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था कशी बिघडेल आणि आमची भेट ना करण्याचे कारण सांगितल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत म्हणून गेल्या दोन दिवसापासून श्रीमती प्रियंका गांधी सह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्तर प्रदेश मध्ये धरणे आंदोलन करत आहे.
याच पार्श्वभूमीवर परळी काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलने करण्यात आली दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला तसेच परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व परळी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध नोंदवला
आपल्या भाषणात तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते प्रा नरहरी काकडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे म्हणाले की उत्तर प्रदेश मधील सरकारने हुकूमशाही व दडपशाही सुरू केली आहे नाहक गरीब आदिवासी कुटुंबावर हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना आहे तसेच उत्तर प्रदेश मध्ये याही अगोदर आदिवासी अल्पसंख्यांक दलित व बहुजन समाजाच्या लोकांवर हल्ले करण्यात आले आहेत ही अतिशय निषेधार्य बाब आहे येथून पुढे असे हल्ले काँग्रेस पक्ष व युवक कॉग्रेस सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला
यावेळी परळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे उपाध्यक्ष नितीन शिंदे जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे गोपीनाथ लोखंडे बद्दर भाई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज आप्पा संकाये तालुकाध्यक्ष राहुल कांदे शहराध्यक्ष किशोर जाधव माजी नगरसेवक विश्वनाथ देवकर सुदाम लोखंडे रघुनाथ डोळस शहर उपाध्यक्ष श्याम गडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटी गीते मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ माणिक कांबळे युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत तोतला पंचायत राज संघटनचे शहराध्यक्ष नवनाथ क्षीरसागर विठ्ठल गायकवाड ज्ञानेश्वर खर्डे एन एस यू आयचे शहराध्यक्ष सोनू कांबळे युवक काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत गुट्टे शिवा बडे शिवा चिखले शेख बाबा सप्तर आली यशवंत बलकर अशोक साळवे किशोर पारधे शेख सिकंदर भागवत ढाकणे विठ्ठल साखरे अशोक कांबळे गणेश भंडार सिद्धेश्वर मुंडे वृक्षराज आंधळे केशव फड शेख मुख्तार चांद भाई धनराज जाधव सरपंच भागवत मुंडे बाबासाहेब मुंडे विजय लांडगे मतीन मनियार लिंबाजी नागरगोजे इत्यादी सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
