Wednesday, June 20, 2018

महेश नवमी निमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपन शिबीर


परळी (प्रतिनिधी ) :परळी शहरात दि.21 रोजी महेश नवमी याच औचित्यावर बीड जिल्हा माहेश्वरी संगठन तथा परळी तालुका माहेश्वरी युवा संगठनेच्या वतीने भव्य रक्तदान व वृक्षारोपन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देण्यात आली आहे.
   गुरूवार दि.21 जुन रोजी सकाळी 11 वाजल्यापासून या कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. परळीतील श्री राम-दत्त मंदिर, (बालाजी मंदीर) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहीती संगठनेच्या वतीने देण्यात आली आहे. देशात व राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आपण रक्तदान केल्याने गरजू रूग्णांचे प्राण वाचू शकतात या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केला गेला असून, यावेळी वसुंधरेच्या रक्षणासाठी छोटासा प्रयत्न म्हणून वृक्षारोपनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा माहेश्वरी संगठनेचे अध्यक्ष पंकज तापडीया, सचिव तपन मोदानी तथा परळी तालुका माहेश्वरी युवा संगठनचे अध्यक्ष सचिन सारडा, सचिव अभिषेक बियाणी यांनी केले आहे.