Thursday, June 21, 2018

मुलींना छेडणार्‍या रोडरॉमियोवर कारवाई करावी-नेताजी सोळुंके


परळी वै. :  प्रतिनिधी
परळी शहरात पण विद्यार्थींची छेडछाड होऊ नये यासाठी चिडीमार पथक कार्यान्वित करणे. महिला व बालकल्याण मंत्र्याचे बंधु राणा डोईफोडे यांना तात्काळ अटक करावे असे आवाहन नेताजी सोळुंके यांनी केले आहे.
परळी शहरात विविध कॉलेज व विद्यालय  आहेत.  त्या कॉलेजच्या विविध विद्यार्थ्यांना रोडे रोमियोपासून त्रास होऊ नये. यासाठी चिडीमार पथक कार्यान्वित करावे.काही महिन्यापुर्वी स्वतःच्या महाविद्यालयामध्ये मी पालक मंत्र्याचा भाऊ आहे अशी धमकी देवून विद्यार्थीनिवर अत्याचार करण्यात आले त्या नराधम राणा डोईफोडे याला अटक करण्यात यावे अन्यथा रा.वि.कॉ.आमच्या बहिनींना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.शहर पोलिस निरीक्षक यांना रा.वि.काँ.च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रा.काँ.चे शहराध्यक्ष अनंत ढोपरे, रा.वि.काँ.चे कार्याध्यक्ष प्रतिक बद्दर, रा.काँचे सरचिटणीस संकेत दहीवाडे, रा.काँ.चेे सरचिटणीस नरेश वाळके, रा.वि.काँ.चे उपाध्यक्ष आकाश डोंगरे, विशाल चव्हाण, नरेश सुरवसे, ऋशीकेश फड, निर्सग जमशेटे आदी उपस्थित होते.