Sunday, June 24, 2018

डॉ. तुळशीराम गुट्टे यांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर



डॉ. तुळशीराम गुट्टे यांना विशेष गौरव पुरस्कार
धर्मापूरी (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे संस्थापक अध्यक्ष तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पु स्वामी डॉ.तुळशिराम महाराज गुट्टे यांना पुणे येथील बालगंधर्व परिवाराचा विशेष गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन या संस्थेअंतर्गत समाजाच्या हितासाठी, समाजसेवा हीच ईश्वरसेवा हा केंद्रबिंदू मानून विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. समाजसेवेतील व  साहित्यिक क्षेत्रातील योगदान व सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन  बालगंधर्व परिवार पुणे यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त. दिनांक २५ जून २०१८ रोजी . बालगंधर्व रंगमंदिर शिवाजी नगर पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..
          डॉ.गुट्टे महाराज यांना याआधीही  समाजसेवेतील व  साहित्यिक क्षेत्रातील योगदान व सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन ’ब्रम्हीभूत नाना महाराज साखरे पुरस्कार’, ’श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार’, ’गौरव महाराष्ट्र पुरस्कार’ व ’विशेष कार्य गौरव आदी पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे.