परळी न.प. शिक्षण समिती आयोजित स्व. पंडीतआण्णा मुंडे स्मृती पुरस्काराचे थाटात वितरण
परळी वै. (प्रतिनिधी) : स्वत:च्या शिक्षणाचा त्याग करून आपल्या कुटूंबातील कनिष्ठ भावंडाना उच्च शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करून व खऱ्या अर्थाने व्यवहारीक ज्ञानाच्या प्रभावाने उच्च शिक्षीतांनाही आदर्शवत ठरतील अशा स्व. पंडीतआण्णा मुंडे यांच्यामुळे आम्हा मुंडे घराण्याची आज दिसत असलेली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगती आहे. स्व. पंडितआण्णा मुंडे यांचे हेच कार्य न. प. शिक्षण समितीने त्यांच्या नावाने न. प. तील कर्मचाऱ्यांना पुरस्कार देवून व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सुरू ठेवले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केले.
परळी नगर परिषद शिक्षण समिती व डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज दिनांक 29 जुन रोजी स्व. पंडीतआण्णा मुंडे स्मृती पुरस्कार वितरण व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. सरोजनीताई हालगे प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, न.प. गटनेते वाल्मीक आण्णा कराड, जि.प. सदस्य अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, पं.स. सभापती सौ, कल्पनाताई सोळंके, कृ.उ.बा.स. सभापती सुर्यभान मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष ऍड. गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक शरद मुंडे, चंदुलाल बियाणी, रा.कॉ. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जेष्ठनेते प्रा. डॉ. मधुकर आघाव, माजीनगराध्यक्ष दिपकनाना देशमुख, रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, परळी विधान सभा अध्यक्ष गोविंद देशमुख, पं.स. उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, रा.कॉ. महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. अर्चना रोडे, रा.कॉ. शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष डि. जी. शिंदे, शहराध्यक्ष अजय जोशी आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, परळीची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत आहे. परंतु आज ही लातूरच्या धर्तीवर परळीत गुणवंत तयार होत नाहीत. यासाठी शिक्षक व संस्था चालकांनी मेहनत घेण्याची गरज आहे. पालकांनी ही आपल्या पाल्यांना केवळ गुणांसाठी शिक्षण देवू नये तर व्यवहारीक शिक्षण दिले तर भविष्यात हे विद्यार्थी यशस्वी होतील असे सांगितांना न. प. शिक्षण समितीच्या वतीने या वर्षी निवडण्यात आलेल्या पुरस्कार व देण्यात आलेले विशेष गौरव हे त्या पुरस्कर्त्या व्यक्तीसाठी खूप मोठी उपलब्धी असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. भविष्यात परळी शहरात शिक्षण वाढीसाठी आपण भरघोस सहकार्य करू असे सांगतांना गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा स्व. पंडीतआण्णा मुंडे पुरस्कार भविष्यात कायम रहावा यासाठी न.प. पदाधिकाऱ्यांनी तशी तरतुद करण्याची सुचना ही केली. यावेळी ना मुंडे यांच्या हस्ते स्व. पंडितआण्णा मुंडे पुरस्कार प्राप्त न. प. कार्यालयीन अधीक्षक वामन नारायण जाधव, लिपीक बाबासाहेब नारायण पारेकर, स्वच्छता निरीक्षक शंकर नारायण साळवे यांचा तसेच रंगभुषा क्षेञात परळीचा नावलौकीक वाढविणाऱ्या लखन परळीकर आणि एम्सच्या परिक्षेत देशात 41 वा आलेल्या लोकेश मंडलेचा, बचपन प्ले स्कुलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याबद्दल या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये यश संपादन केलेल्या परळी मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तु, स्मृतीचिन्ह, प्रमाणपञ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन सिध्देश्वर ढाकणे, मिनाक्षी जाधव, संजय सुरवसे यांनी तर आभार कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे मानले.
ना. मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात अधिक चांगले कार्य करू - गोपाळ आंधळे
यावेळी प्रस्ताविक करतांना आयोजक तथा परळी नगर परिषदे शिक्षण समिती सभापती गोपाळ आंधळे यांनी या पुरस्कारापाठी मागची भूमिका सांगितली की, स्व. पंडीतआण्णा मुंडे हे व्यक्तीमत्व म्हणजे उत्तुंग असे होते. आपले शिक्षण बाजूला सारत त्यांनी एक लोकनेता घडविला तर दुसऱ्या लोकनेत्याची पेरणी करून गेले ते म्हणजे ना. धनंजय मुंडे आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी उत्तम रित्या कार्य करत असून भविष्यात 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पुरस्कारा बरोबरच परळी शहरातील उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळेचा ही गौरव करण्यात येणार असल्याची संकल्पना मांडली. यासाठी व्यापक समिती स्थापन करून हा सोहळा ही ना. धनंजय मुंडे यांच्या हस्तेच करण्याचा मनोदय व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी न.प. मुख्याधिकारी, बांधकाम सभापती रिहानबी शेख शरीफ, स्वच्छता सभापती विजय भोयटे, पाणी पुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भावड्या कराड, महिला व बालकल्याण सभापती सौ. मिना पांडूरंग गायकवाड, उपसभापती सौ. कमल रावजी कुकर, नगरसेवक शकील कुरेशी, राजा खॉ पठाण, सौ. शोभाताई चाटे, अमृता रोडे, सौ. उर्मिला रोडे, सौ. प्रियंका रोडे, सौ. रेश्मा बळवंत, सौ. शहॉजहॉं बेगम खान, शेख अन्वर मिस्कीन, किशोर पारधे, अजीज कच्छी, जयप्रकाश लड्डा, सौ. अन्नपूर्णा आडेपवार, संजय फड, अनिल अष्टेकर, सौ. राजश्री देशमुख, सौ. नाजेमाबी पठाण, ग्रंथपाल रावसाहेब जाधव, सुनिता बारड, बंडू जाधव, दत्ता पोहनेरकर, ञिंबक शिंदे, भगवान काकडे, वजीर खान, पंकज दहातोंडे, अनिता वाल्मीकी , हनुमान आगरकर आदिंनी परिश्रम घेतले.