परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मारवाडी युवा मंच परळीच्या वतीने समाजभुषण स्व. सुवालाल वाकेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण बुधवार दि. 27 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आ. अमित देशमुख तर अध्यक्ष म्हणून डॉ. अशोक कुकडे , वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्लोबल फाऊंडेशनचे विश्वस्त मयंक गांधी (समाजभुषण), कॉमनवेल्थ गेम्स्मधील कुस्तीचे सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे (क्रीडा भुषण) व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (साहित्यभुषण) यांच्या हस्ते गोपाल बालकिशन सोनी याचा 12 वी परिक्षेत मिळवलेल्या यशाबदल सत्कार करण्यात आले.